बेळगाव : “आरोग्य हीच खरी धनसंपदा” शालेय वयातच मुलांना आरोग्याचे महत्व, आरोग्य विषयक समस्या व उपाय याविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेत मुलींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. सविता कद्दू, आय.एम.ए. अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ तसेच जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. एस. बिर्जे हे होते.
यावेळी मुलींच्या आरोग्य विषयक समस्या व सुदृढ आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उदय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. नीता गुंजीकर यांनी केले.
