Saturday , June 15 2024
Breaking News

बसगौडांचे त्याग वरदान ठरले : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : सहकार महर्षी दिवंगत बसगौडा पाटील यांचे त्यागमय जीवन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सहकारी नेते डी. टी. पाटील यांनी भूषविले होते. निडसोसी श्री जगद्गुरु दुरदुंडीश्वर शिक्षण संस्थेतर्फे सहकार महर्षी दिवंगत बसगौडा पाटील यांची तृतीय पुण्यतिथी तालुक्यातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाने आचरणेत आली. श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या हस्ते डी. टी. पाटील, नागपण्णा करजगी, बाळकृष्ण हतनुरी, कृष्णकांत मुळे, दामोदर खटावकर, हाजी हुसैन मोकाशी तसेच अन्य ज्येष्ठांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
श्री पुढे म्हणाले, बसगौडांनी आपले जीवन समाजासाठी समर्पित केले होते. त्यांचे जगणे निस्वार्थी होते. त्यांनी आपल्या ६१ व्या वाढदिवशी जमा झालेले ४० लाख रुपये श्रींच्या चरणी अर्पण करून निडसोसीत डिप्लोमा काॅलेजची स्थापना केली. अमृतमहोत्सवी वाढदिवसाला ७५ लाख रुपये गोळा करुन रुरल इंजिनिअरिंग कॉलेजचा मुहुर्तमेढ रोवला बसगौडांमुळे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना तांत्रिक-अभियांत्रिकी शिक्षण घेऊन परदेशात नोकरी मिळविता आली. त्यामुळे बसगौडांचे त्याग ग्रामीण भागातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना वरदान ठरले आहे. बसगौडांनी कृषी सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य आदर्श ठरले आहे.त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविण्याचे कार्य ए. बी. पाटील करणाहेत. आज सर्वजन जास्तीत जास्त पैसे मिळविण्याच्या मागे लागलेले दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीत स्वार्थी वृती बळावलेली दिसून येते आहे. दुसऱ्यांसाठी जगणे, समाजासाठी जगणे या गोष्टी आता कालबाह्य होताना दिसत आहेत. ए. बी. पाटील यांनी बसगौडांची तिसरी पुण्यतिथी शेकडो ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाने आचरणेत आणून समाजापुढे नवा आदर्श ठेवल्याचे श्रींनी सांगितले.
प्रमुख पाहुणे ॲड. बी. एल. पाटील म्हणाले, बसगौडा पाटील यांनी केलेले कार्य लोकांच्या कायम स्वरुपी स्मरणात राहणार आहे.त्यांनी आपले जीवन समाजाला समर्पित करुन कृषी, सहकार शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य आदर्शवत ठरले आहे. शेतकऱ्यांच्या सभेसाठी त्यांनी विधानपरिषद शपथविधी दुसऱ्यादिवशी ठेवून घेण्यास भाग पाडला होता. रयतांविषयी त्यांच्यात तळमळ होती. यावेळी माजी मंत्री ए. बी. पाटील, वक्ते कुमार होन्नाईक यांनी बसगौडा पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव केला. यावेळी एसजेडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनयगौडा पाटील, उपाध्यक्ष निरंजनगौडा पाटील, कार्यदर्शी डॉ. बी. ए. पुजारी, एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.जी. एस. इंडी, संचालक ॲड. आर. बी. पाटील, गंगाधर मुडशी, बसनगौडा पाटील, दयानंद केस्ती, नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, जितेंद्र मरडी, अण्णागौडा पाटील, एस. एल. पाटील, के. एम. पाटील, प्रशांत मन्नीकेरी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वर बायपास रस्त्यावर वाहनांवर दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर बायपास रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चालत्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *