Saturday , July 27 2024
Breaking News

हुक्केरीचा नेक्स्ट आमदार कोण?

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : पुढील वर्षी २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक असल्यामुळे कत्ती बंधू हळूवारपणे तयारीला लागलेले दिसत आहेत. विधानसभेच्या आखाड्यात वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती उतरणार की आपल्या मुलांना आखाड्यात उतरविणार? याविषयीची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली दिसत आहे. मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणुकीत मुलांना आखाड्यात उतरविणार असल्याचे जाहीर केल्यामुळे हुक्केरीचा नेक्स्ट आमदार कोण? हे जाणून घेण्याचे औत्सुक्य लोकांत निर्माण झालेले दिसत आहे. मंत्री उमेश कत्ती हे हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून सातत्याने आठ वेळा निवडून जाणारे आमदार ठरले आहेत. कत्ती परिवाराने विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्ष निखिल कत्ती, धडाडीचे युवानेते पवन कत्ती, पृथ्वी कत्ती यामध्ये कोणाला उतरविणार याविषयीचे बरेच तर्कवितर्क राजकीय वर्तुळात वर्तविले जात आहेत. राजकीय तज्ञांनी तिचा कत्ती भावंडांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. ते नाव लवकरच लोकांना समजणार आहे. नुकताच संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवस कार्यक्रमात मंत्री उमेश कत्तीं माजी खासदार रमेश कत्ती निखिल कत्ती, पृथ्वी कत्ती सहभागी झाले होते. कत्ती बंधूंनी राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवशी कार्यक्रमातून कणगला जिल्हा पंचायतची पकड मजबूत केलेली दिसत आहे. राजेंद्र पाटील यांच्या कार्याची तोंडभरून स्तुती करत त्यांनी कणगला जिल्हा पंचायतची धुरा सोपविलेली दिसत आहे. हुक्केरीचा नेक्स्ट आमदार दुसरा-तिसरा कोणी नसून कत्ती परिवारातील एखादी व्यक्ती राहणार हे निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *