Tuesday , March 3 2026
Breaking News

केकेआर टीमला मिळाला नवा कर्णधार; नितीश राणा संघाचे नेतृत्व करणार

Spread the love

 

नवी दिल्ली : दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. संघाचा युवा खेळाडू नितीश राणा संघाची धुरा सांभाळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सनेही त्यांच्या सोशल मीडियावर अधिकृतपणे याची पुष्टी केली आहे. संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे.
अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या घरच्या कसोटी सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीसाठीही उतरला नाही. पाठदुखीमुळे तो आयपीएलचे पहिले काही सामने खेळू शकणार नाही. पाठदुखीतून बरा झाल्यानंतर तो संघात सामील होणार आहे.
नितीश राणा कोलकाता नाईट रायडर्सचा सातवा कर्णधार असेल. संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ 14 सामने खेळला आहे. यातील 6 सामने जिंकले आहेत, तर 8 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय सौरभ गांगुली, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, ब्रेंडन मॅक्क्युलम आणि इऑन मॉर्गन यांनीही कोलकाता नाईट रायडर्सची कमान सांभाळली आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक सामने खेळले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली एकूण 108 सामने खेळले गेले, त्यापैकी 61 सामने जिंकले, तर 46 सामने हरले.
संघाचा युवा खेळाडू नितीश राणाने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तो संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. गेल्या मोसमात त्याची बॅट जोरदार चालली. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने 91 सामन्यात 134.22च्या स्ट्राईक रेटने 2181 धावा केल्या आहेत. त्यात 15 अर्धशतकांचाही समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *