मुंबई : भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवलेला केएल राहुल तंदुरुस्त झाला आहे. मागील काही दिवसांपासून तो बेंगळुरु येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत होता. बीसीसीआयकडून केएल राहुल तंदुरुस्त असल्याचं सांगण्यात आलेय. तसेच भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यात तो संघाचा कर्णधार असणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी संध्याकाळी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, 30 जुलै रोजी बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली होती. त्यामध्ये केएल राहुलचं नाव नव्हतं. तीन एकदिवसीय सामन्यासाठी संघाची धुरा शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. मात्र, 10 दिवसांत शिखर धवनच्या जागी केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे शिखर धवनचे चाहते नाराज झाल्याची चर्चा आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात शिखर धवनला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
बीसीसीआयने ट्विट करत राहुल फिट असून झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यात संघाचं नेतृत्व करणार असल्याचं सांगितलं आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमध्ये राहुलला खेळण्यासाठी परवानगी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta