Saturday , October 19 2024
Breaking News

थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेवर भारताची माेहर

Spread the love

नवी दिल्ली : भारतीय संघाने बॅडमिंटनमध्‍ये आज ऐतिहासिक कामगिरी करत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेवर आपले नाव कोरले. या स्‍पर्धेत १४ वेळा अजिंक्‍यपद पटकावणार्‍या इंडोनेशिया संघाचा अंतिम सामन्‍यात 3-0 असा पराभव करत भारताने सुर्वणपदकावर आपली मोहर उमटवली. किदांबी श्रीकांत याने तिसरा गेम जिंकला आणि देशभरात उत्‍साहाला उधाण आलं. कारण ही स्‍पर्धा बॅटमिंटनमधील विश्‍वचषक मानली जाते.
थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा यापूर्वी १४ वेळा जिंकणारा इंडोनेशिया संघ सुरुवातीपासूनच प्रबळ दावेदार मानला जात होता. अंतिम सामन्‍यात भारताने धडक मारली. पहिल्‍या सामन्‍यात भारताच्‍या २० वर्षीय लक्ष्‍य सेन याने ॲथनो गिटिंगाचा पराभव केला. यानतंर दुहेरीच्‍या सामन्‍यात सात्‍विक साईराज रंकीरेड्‍डी आणि चिराग शेट्‍टी हे पहिल्‍या गेममध्‍ये मोहम्‍मद एसहान आणि केव्‍हिन संजय यांच्‍याकडून पराभूत झाले मात्र यानंतर कमबॅक करत त्‍यांनी पुढील दाेन्‍ही गेम २३-२१ आणि २१-१९ असे जिंकत अटीतटीच्‍या सामना भारताच्‍या नावावर केला. यानंतर श्रीकांत किदांबी याच्‍या सामन्‍यावर सर्वांचे लक्ष वेधले.
राेमहर्षक सामन्‍यात श्रींकातचा लक्षवेधी विजय
तिसरा सामना भारताचा श्रीकांत किदांबी आणि इंडोनेशियाचा जॉनथन क्रिस्‍टी यांच्‍यात रंगला. पहिला गेम श्रीकांतने २१-१५ असा जिंकला. दुसरा गेम खूपच रंगतदार झाला. क्रिस्‍टीने श्रीकांतला जोरदार टक्‍कर दिली. या गेममध्‍ये श्रीकांतला ११-८ अशी आघाडी होती. मात्र क्रिस्‍टीने बरोबरी साधली. अखेर दोघेही खेळाडूचे २१-२१ गूण झाल्‍यानंतर कोट्यवधी भारतीयांच्‍या श्‍वास रोखला होता. अखेर श्रीकांतने सलग दोन गुण आपल्‍या नावावर करत सामना २३-२१ असा जिंकला.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *