Saturday , July 27 2024
Breaking News

भारतीय ॲथलीट मुरली श्रीशंकरची ग्रीसमधील जागतिक स्पर्धेत ‘सुवर्ण उडी’!

Spread the love

नवी दिल्ली : भारतीय खेळाडू आता हळूहळू जगभरात आपली ताकद दाखवत आहेत. एकीकडे नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला. त्याचबरोबर एका भारतीय ॲथलीटने लांब उडीत देशाचे नाव रोषण केले आहे. मुरली श्रीशंकरने ग्रीसमध्ये ८.३१ मीटर लांब उडी मारून सुवर्णपदकाला गवसणी घालत इतिहास रचला.
मुरली श्रीशंकरने ग्रीसमधील 12व्या आंतरराष्ट्रीय जंपिंग मीटमध्ये ऐतिहासिक उडी मारून सुवर्ण जिंकण्याची अप्रतिम कामगिरी केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या श्रीशंकरच्या नावावर ८.३६ मीटरचा राष्ट्रीय विक्रम आहे. ग्रीसमधील स्पर्धेत स्वीडनच्या टोबियास मॉन्टलरने ८.२७ मीटर उडी मारून रौप्यपदक पटकावले, तर फ्रान्सच्या ज्युल्स पोमेरीने कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेत केवळ अव्वल तीन खेळाडूंनाच आठ मीटरच्या पुढे लांब उडी मारण्यात यश आले.
ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने मुरली श्रीशंकरच्या ऐतिहासिक कामगिरीविषयी फोटोसह ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘श्रीशंकरने ग्रीसच्या कालथिया येथील 12 व्या आंतरराष्ट्रीय जंपिंग मीटमध्ये ८.३१ मीटर उडी मारली. ऑलिम्पिकनंतरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत असलेल्या श्रीशंकरने सरावादरम्यान ७.८८ मीटर आणि ७.७१ मीटर उडी मारली होती.’

About Belgaum Varta

Check Also

भारताचा जगज्जेता संघ मायदेशी परतला; चाहत्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत

Spread the love  नवी दिल्ली : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *