Sunday , July 26 2026
Breaking News

शहरातील 12 ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची झाडाझडती

Spread the love

बेळगाव : शहर उपनगर परिसरात रहदारी पोलीसांची कारवाई नेहमीच पाहायला मिळत असते. मात्र आज गुरुवारी सायंकाळी बेळगाव शहर आणि उपनगरातील एकूण बारा ठिकाणी रहदारी पोलिसांनी अचानकपणे वाहनधारकांची झाडाझडती सुरू केली. त्यामुळे वाहनधारकांची एकच तारांबळ पाहायला मिळाली.
शहर उपनगरातील विविध महत्त्वाच्या चौक आणि रस्त्यांवर रहदारी पोलिसांनी आज अधिकाऱ्यांसह ठिय्या मांडलेला दिसून आला. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनधारकांकडून कागदपत्रे तपासणी केली जात होती. त्याचबरोबर विना हेल्मेट, विना सीट बेल्ट तसेच रहदारी नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली.
एरवी कधीही न दिसणाऱ्या ठिकाणी आज रहदारी पोलीस अचानक पणे प्रकट झाले. त्यामुळे सुसाट वाहने हाकणारे आणि रहदारी नियम धाब्यावर बसवणार्‍या वाहनचालकांना आज चांगलाच चाप बसला. दरम्यान रहदारी पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळाल्याने अनेक वाहनधारक आडमार्गाने आपला मोर्चा वळवताना दिसत होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *