बेळगाव : अनेक वेळेला संबंधितांना विनंती करूनही मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा दुरूस्ती करण्यात आला नव्हता. त्यामुळे श्रीराम कॉलनी आदर्श नगर मुख्य रस्त्यावर असलेला तो खड्डा स्थानिक नागरिकांनी रोज होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी पुढाकार घेऊन श्रमदानातून दुरुस्त केला.
गेल्या काही वर्षांपासून हा खड्डा पडला होता. महानगरपालिकेने अशा कामांना युद्ध पातळीवर करून घेतले पाहिजे, पण निव्वळ दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर श्रीराम कॉलनी आदर्श नगर रहिवासी संघटनेतर्फे पुढाकार घेऊन श्रमदानातून हे दुरुस्तीचे काम करण्यात आले.
या भागात गटारी बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे, याबरोबरच गार्डनकडे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली
याकामी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जोशी, शंकर चौगुले, बाबुराव घोरपडे, प्रदीप चव्हाण, प्रकाश सुळेभावी, उमेश वाळवेकर व डॉक्टर पट्टणशेट्टी यांनी पुढाकार घेऊन हे काम केले.
Check Also
सौंदती रेणुकादेवी यात्रेत सोयी सुविधा उपलब्ध करून द्या
Spread the love कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे बेळगाव : पुढील महिन्यात १२ …