कलबुर्गी : कलबुर्गी जिल्ह्यातील जेवर्गी तालुक्यातील नेलोगी क्रॉसजवळ शनिवारी पहाटे उभ्या असलेल्या लॉरीला मिनी बस धडकल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात वाजीद, मेहबूबी, प्रियांका आणि मेहबूब यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. मृत सर्व नवनगर ता. बागलकोट येथील रहिवासी होते.
कलबुर्गी येथील खाजा बंदेनवाज दर्ग्यात जात असताना सदर अपघात घडला. मिनी बसमधील एकूण 31 जणांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले. सध्या जखमींना कलबुर्गी येथील जिम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.