बेंगळुरू : कर्नाटकचे नवे उपलोकायुक्त म्हणून न्यायमूर्ती के. एन. फणींद्र यांनी मंगळवारी सूत्रे स्वीकारली. बंगळुरात मंगळवारी राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नवे उपलोकायुक्त म्हणून न्यायमूर्ती के. एन. फणींद्र यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभा उपसभापती आनंद मामनी, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद, आ. सुरेशकुमार, राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार, पोलीस महासंचालक प्रवीण सूद, ऍडव्होकेट जनरल प्रभुलिंग नावदगी आदी उपस्थित होते.
