Thursday , June 20 2024
Breaking News

ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री बोम्मईनी घेतली उच्चस्तरीय बैठक

Spread the love


बेंगळुर : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत अन्य मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली बंगळुरात आज बैठक पार पडली. ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत अन्य मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची मागणी राज्यात जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी विधिमंडळात सत्ताधारी भाजप सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न नुकताच केला होता. त्यावेळी सर्व पात्र समुदायांना आरक्षण देण्यास सरकार वचनबद्ध आहे असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले होते.
गुरुवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेही उपस्थित होते. बैठकीला कायदा व संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. माधुस्वामी, जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, नगरविकास मंत्री बैरती बसवराज, एमटीबी नागराज, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद, जेडीएस नेते बंडेप्पा काशमपूर, अ‍ॅड. जनरल प्रभुलिंग नावदगी यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला इंधन दरवाढीचा बचाव

Spread the love  विकास कामासाठी वापराची ग्वाही बंगळूर : लोकसभा निवडणुकीत हमी योजनांचा काँग्रेसला फारसा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *