Saturday , July 27 2024
Breaking News

बेंगळुरू : सहा शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Spread the love


बेंगळुरू : शहरातील सहा शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीनंतर एकच खळबळ उडाली असून, धमकीचा मेल मिळाल्यानंतर बॉम्बविरोधी पथकाने संबंधित शाळांमध्ये तपास सुरू केला आहे. शहरातील सहा शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या असून, पोलिसांचे पथक घटनास्थळी तपास करत आहेत, अशी माहिती बेंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली आहे. मिळालेल्या मेलमध्ये शाळांमध्ये अतिशय शक्तीशाली बॉम्ब पेरण्यात आल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
शहर पोलीस आयुक्त म्हणाले की, बेंगळुरूच्या बाहेरील सहा शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या असून, या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, घटनास्थळी बॉम्ब निकामी करणारे पथकही पाठवण्यात आले आहे. तसेच देण्यात आलेल्या धमक्यांचा हा प्रकार फसवी असल्याचे दिसून येत आहे. मात्र, शाळांचा कॅम्पस आणि परिक्षा सुरु असलेल्या परिसरात पोलीस दाखल झाले असून, विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यात येत आहे.
सकाळी 11 च्या सुमारास मिळाला धमकीचा मेल
पोलिसांनी सांगितले की, शहरातील सुमारे सहा शाळांना बॉम्बने उडवून देणारा धमकीचा मेल सकाळी 11 च्या सुमारास पाठवण्यात आला आहे. यात संबधित शाळांच्या कॅम्पसमध्ये अतिशय शक्तिशाली बॉम्ब पेरण्यात आल्याचा उल्लेख ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. त्याशिवाय हा विनोद नसून ताबडतोब पोलिसांना आणि सॅपर्सना बोलवा, अन्यथा तुमच्यासह शेकडो जीवनाला धोका होऊ शकतो. उशीर करू नका, सर्वकाही फक्त तुमच्या हातात आहे! असा उल्लेख पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये करण्यात आला आहे.
या शाळांना मिळाला धमकीचा मेल
1. दिल्ली पब्लिक स्कूल, वरथूर
2. गोपालन इंटरनॅशनल स्कूल
3. नवीन अकादमी शाळा
4. सेंट व्हिन्सेंट पॉल शाळा
5. इंडियन पब्लिक स्कूल, गोविंदपुरा
6. एबेनेझर इंटरनॅशनल स्कूल, इलेक्ट्रॉनिक सिटीलाइव्ह टीव्ही

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट

Spread the love  शिरूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *