बेंगळुरू : भाजपचा प्रभाव करायची इच्छा असेल तर, धर्मनिरपेक्ष तत्वांवर विश्वास असेल तर जेडीएसने राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार मन्सूर अलिखान यांना पाठिंबा द्यावा, असे माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी सांगितले.
धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यायचे असेल तर कमी जागा असलेल्या काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ट्विट करून केले आहे. त्यावर बंगळुरात गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्दरामय्यांनीही प्रतिक्रिया दिली. आम्ही 80 जण असताना काय केले ते सांगा असे प्रसारमाध्यमांना त्यांनी ठणकावून सांगितले. आम्ही जेडीएसच्या आधी एक दिवस अल्पसंख्यांक उमेदवार दिला आहे. कुमारस्वामींनी आपला उमेदवार मागे घेऊन आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे त्यांनी सांगितले.
जेडीएसकडून आम्हाला किती मते मिळतील हे सांगता येत नाही. परंतु आत्मसाक्षी राहून मते देणारे आमदार आहेत. ते मते देतील. अनेकांना संपर्क केला आहे. ते मत देण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीत आम्ही 100% जिंकू असा विश्वास सिद्दरामय्यांनी व्यक्त केला.
