बेळगाव : बेळगाव जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांची सरकारने तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी डॉ. महेश कोणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांची सरकारने कोणतेही कारण न देता तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी डॉ. महेश कोणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. डॉ. महेश कोणी सध्या गोकाक येथे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर म्हणून सेवा बजावत आहेत. विशेष म्हणजे डॉ. शशिकांत मुन्याळ यांची बेळगाव जिल्हा आरोग्याधिकारी पदावरून बदली केली असली तरी त्यांना अद्याप अन्यत्र नियुक्ती देण्यात आलेली नाही. डॉ. शशिकांत मुन्याळ कर्तव्यदक्ष जिल्हा आरोग्याधिकारी म्हणून परिचित आहेत. कोरोना काळात त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. कोरोना लसीकरणासह सरकारी आरोग्य योजनांचा तळागाळातील जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत.
