बेंगळुरू: गेल्या कांही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून आज बुधवारी सकाळी बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज सकाळी 11 वाजता बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपद व गोपनीयतेची शपथ देवविली. शपथविधीप्रसंगी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह भाजपचे केंद्र व राज्यातील अनेक बडे नेते उपस्थित होते.
कोण आहेत बसवराज बोम्मई?
येडियुरप्पांप्रमाणेच बसवराज बोम्मई हे देखील लिंगायत समाजाचे नेते असून ते येडियुरप्पांचेच निकटवर्तीय मानले जातात. 61 वर्षीय बसवराज बोम्मई यांनी आत्तापर्यंत गृहविभाग, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आत्तापर्यंत पार पाडली. मंगळवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी बोम्मई यांनी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंह यांची बंगळुरूमध्ये भेट घेतली. याशिवाय, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी पक्षाच्या 40 आमदारांनी देखील त्यांची भेट घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta