खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात नुकताच थैमान घातलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत ३३३ घरे जमीनदोस्त झाली आहेत.
शहरासह तालुक्यातील विविध गावात मुसळधार पावसामुळे घरे पडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.
या कुटूंबाना तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.
मागील आठवड्यात गुरूवारी व शुक्रवारी मुसळधार पाऊस पडून प्रचंड नुकसान झाले. या दुष्काळ निवारणासाठी विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्यानी खानापूर तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली. यावेळी राज्य सरकारने घरे पडलेल्या प्रत्येक कुटुंबाना पाच लाख आर्थिक मदत केली पाहिजे असे सांगितले. त्यामुळे खानापूर तालुक्यातील ३३३ घरे पडलेल्या कुटुंबाच्या घरांचे सर्वे लवकरात लवकर करून नागरिकांना मदत व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
तालुक्याच्या तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी प्रत्येक कुटूंबाना आर्थिक मदत व्हावी. यासाठी प्रयत्न करावे व नागरिकांना त्याचा लाभ करून द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
