बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यातील कोरोना संकट गंभीर होताना दिसत आहे. कोरोनानं हळूहळू सर्वच शहरांमध्ये हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. कोरोनानं डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू लागू (रात्री 9 ते सकाळी 5) करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळेत कलम 144 लागू राहील.
तसेच सीमेवरील बेळगाव, बिदर, गुलबर्गा, म्हैसूर, चामराजनगर, दक्षिण कन्नड, कोडगू आणि विजापूर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यूची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. राज्यातील अनेक शहरातील परिस्थिती कोरोनामुळे बिघडत चालली आहे. रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून, जिल्हा व महापालिका प्रशासन सर्तक झालं आहे.
कोरोना परिस्थितीसंदर्भात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. केरळ आणि महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा संसर्ग आपल्या राज्यात होऊ नये यासाठी कर्नाटक शासन सुरुवातीपासूनच दक्ष असल्याचे दिसून येत होते.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कोरोना रुग्ण वाढल्यास संबंधित जिल्ह्यातील अधिकार्यांना जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सीमेवर काटेकोर तपासणी केली जात आहे. लस घेतली तरी सर्वांनाच 72 तासांमधील कोरोना निगेटिव्ह अहवाल सक्तीचा.
Check Also
टिळकवाडी येथील न्यू शिवाजी कॉलनीतील परिसर बनला कचरा डेपो!
Spread the love बेळगाव : मंत्री महोदय येती गावा, तोची दिवाळी दसरा अशी काहीशी स्थिती …
Belgaum Varta Belgaum Varta