हुबळी : पीक विम्याची फसवणूक केली जाणार नाही. फसवणूक करणार्या कंपन्यांना ताकीद देण्यात आली असून ज्या कंपन्यांवर आरोप करण्यात आले आहेत, अशा कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी दिले आहे.
हुबळी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली असून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कर्जाबद्दल नोंदी पुरेशा असल्याचे ते म्हणाले. बँकांनी नोटीस दिली किंवा नाही यापेक्षा शेतकर्यांनी कर्जासाठी दिलेला अर्ज पुरेसा असल्याचे ते म्हणाले. समिती पुनरावलोकन करून भरपाई देईल, परंतु भरपाई देण्यासाठी अर्ज महत्वाचा असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. पीक नुकसान भरपाई देण्यासाठी नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात येईल, 30 पर्यंत नुकसान भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सुचवण्यात आले असून, नोव्हेंबर महिन्यात 5 लाख हेक्टर प्रदेशातील पिकांचा सर्वनाश झाल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत 11 लाख हेक्टरमधील पिकांचा नाश झाला असून याचा सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कृषी, महसूल, फलोत्पादन विभागाच्या अधिकार्यांना सूचना देण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. पीक विम्याबाबत शेतकर्यांची फसवणूक होऊ देणार नाही, असे कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी स्पष्ट केले.
