प्राणलिंग स्वामींचा पुढाकार ; मठात आज श्रावण समाप्ती महोत्सव
निपाणी (वार्ता) : येथील चिकोडी रोडवरील वीरुपक्षिंग समाधी मठात प्राणलिंग स्वामींच्या मार्गदर्शनाखाली श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ ट्रस्ट तर्फे शनिवारी (ता.१६) श्रावण समाप्ती महोत्सव होत आहे. या मठामध्ये केवळ धार्मिक कार्यक्रम होत नसून सेंद्रिय शेती, गोपालन, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, योग, प्राणायाम, प्रवचन, महाप्रसाद असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे निपाणी परिसरात मठाची ओळख वेगळ्या प्रकारे झाली आहे.
समाधी मठातील संगमदेव स्वामींच्या निधनानंतर १२ वर्षापूर्वी या मठात प्राणलिंग स्वामींचा पट्टाभिषेक झाला. त्यांनी ५० मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षण आणि वस्तीगृहाची सोय करून दिली आहे. येथे २४ तास निरंतरपणे अन्यथा कार्यक्रम सुरू आहे कोणत्याही प्रसंगाच्या वेळी ते नेहमी धावून जातात. महापुराच्या वेळी नागरिकांना जेवण नाश्ता राहण्याची सोय तर कोरोना काळात आयुर्वेदिक काढा इम्यान्युटी बूस्टरचे शहरासह प्रत्येक गावात वाटप केले आहे. याशिवाय सेंद्रिय शेतीचे महत्व त्यांनी पटवून दिले असून ते स्वतः सेंद्रिय शेती करतात. मठामध्ये १२७ गोवंश असून त्यांची सर्व व्यवस्था करत आहेत. लंपी आजाराच्या वेळी तालुका वैद्याधिकारी डॉ.जयकुमार कंकणवाडे, मठातील वैद्य विकास आर्य यांच्या सहकार्याने आयुर्वेदिक उपचार केले आहेत.
विद्यार्थ्यांना इतिहासाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने गड किल्ले पदभ्रमंती मोहीम ते राबवित आहेत. याशिवाय गोवा विषय संरक्षणासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. एकंदरीत त समाधी मठात केवळ धार्मिक कार्यक्रम न करता समाज उपयोगी उपक्रम राबवीत आहेत.
—————————————————————–
आज विविध कार्यक्रम
श्रावण समाप्तीनिमित्य समाधी मठ येथे शनिवारी (ता.१६) सकाळी गुरू आराधना, त्यानंतर पालखी सोहळा, कणेरी मठ येथील अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींचे प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी निपाणी परिसरातील भाविकांनी आध्यात्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta