Wednesday , May 29 2024
Breaking News

धर्मांतर बंदी विधेयकावरून विधानसभेत काँग्रेस आक्रमक, आमदारांनी केला सभात्याग

Spread the love

धर्मांतर विरोधी विधेयकावर आज होणार चर्चा
बेळगाव (वार्ता) : गेल्या महिन्यापासून चर्चेत असलेल्या धर्मांतर बंदी कायदा विधेयक आज मंगळवारी विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सत्ताधारी पक्षाने आडमार्गाने सदनात विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या विधेयकाला आमचा विरोध आहे असे सांगून संताप व्यक्त केला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सरकार धर्मांतर बंदी विधेयक घाईगडबडीत तसेच विरोधी पक्षाला विश्वासात न घेता सदनात सादर करत असल्याबद्दल, काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.
आज मंगळवारी भोजन सत्रानंतर सुरू झालेल्या कामकाजा प्रसंगी मंत्री आर. अशोक हे अतिवृष्टीवर माहिती देण्यासाठी उभे असतानाच, सभापती विश्वेश्वर कागेरी हेगडे यांनी धर्मांतर बंदी विधेयक मांडण्यास अनुमती दिली. यावेळी विरोधी पक्षातील बहुसंख्य सदस्य सभागृहाबाहेर सदनात उपस्थित नव्हते. सदर विधेयक सदनात मांडले जात असतानाच काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला. सदनात धर्मांतर्गत बंदी विधेयक मांडण्यात येत असल्याचे कळताच विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
उत्तर कर्नाटकातील विकासासंदर्भात चर्चेची मागणी करण्यात आली असताना, व्यक्तिस्वातंत्र्याचे उल्लंघन करत सरकार लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवत धर्मांतर बंदी विधेयक सदनात मांडू पाहत आहे. अशा प्रकारचे सरकार, कर्नाटकच्या इतिहासात प्रथमच पाहत आहोत. विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा महत्त्वाची असताना वादग्रस्त धर्मांतर बंदी विधेयक आणण्याची घाई-गडबड सरकार का करत आहे? वादग्रस्त विधेयकांवर पारदर्शक चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र सरकार आडमार्गाने वादग्रस्त विधेयक सदनात मंजूर करून घेण्याच्या तयारीत आहे, असा आरोपही सिद्धरामय्या यांनी केला.
यावेळी डी. के. शिवकुमार यांनी धर्मांतर बंदी विधेयकाच्या प्रती सभागृहात फाडून आपला संताप व्यक्त केला. निधर्मी जनता दलाचे आम. कुमारस्वामी यांनी सरकारने गोहत्या बंदी विधेयक सादर केले आहे. राज्यात गो-शाळांची अवस्था दयनीय असताना सरकार विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी वादग्रस्त विधेयकांवर भर देत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच वेळी निजद आमदारांनीही, सल्लागार समिती बैठकीत धर्मांतर बंदी विधेयकाबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याची तक्रार मांडली.
यावेळी सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. या गोंधळातच काँग्रेसच्या आमदारांनी सादर करण्यात आलेल्या धर्मांतर बंदी विधेयकाविरोधात जोरदार घोषणा देत सभात्याग केला. दरम्यान उद्या बुधवारी धर्मांतर बंदी विधेयकावर विधानसभेत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन सभापती विश्वेश्वर कागेरी-हेगडे यांनी दिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

हलगा-मच्छे बायपास रस्त्याची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली

Spread the love  बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *