बेळगाव (वार्ता) : केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. राज्यातील कन्नड भाषिकांची चिंता या सरकारला नाही तसेच आतापर्यंत केंद्र सरकारनेही राज्यातील जनतेची कोणती मदत केली नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केलाय. बेळगाव सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रित दिली आहे. कृष्णा नदी प्रकल्पाची राष्ट्रीय योजना करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याकडे राज्यातील भाजप नेत्यांनी निवेदन दिले होते. हि योजना मंजूर झाल्याचे दर्शवून जाहिरातबाजी करून अभिनंदनाचे बॅनर देखील झळकले होते. या घटनेला आता चार महिने होऊन गेले तरी अद्याप याचा निर्णय घेण्यात आला नसून केंद्र सरकारकडून सिंचन प्रकल्पांसाठी 92 हजार कोटींचे अनुदान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसाठी जाहीर करण्यात आले आहेत. परंतु केंद्र सरकारकडून कर्नाटकासाठी कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे. धर्मांतर कायद्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना कुमारस्वामी म्हणाले, काँग्रेसने सभागृहाचा त्याग करून धर्मांतर कायदा पास करण्यासाठी सत्ताधार्यांना संधी दिली आहे. सभागृहात विरोध केला तरी बहुमतात सरकार असल्याने हा कायदा पास होणारच यामुळे दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे हे नाटक असून आपली व्होट बँक जपण्यासाठी करण्यात आलेले हे कारस्थान असल्याचा आरोप देखील कुमारस्वामी यांनी केला. सध्या विधानसभेत धर्मांतर कायदा आणि गोहत्या बंदी कायदा हे दोन मुद्दे अत्यंत ऐरणीवर आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस आणि भाजपाला लक्ष्य करत या मुद्द्यावर दोन्ही पक्षांचे नाटक सुरु असल्याचा आरोप केला आहे.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …