राज्यात दक्षिण कन्नड प्रथम तर गदग अंतिम स्थानावर; बेळगाव २७ व्या, चिक्कोडी १५ व्या स्थानावर
बंगळूर : मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षा-१ चा निकाल जाहीर झाला असून, यंदाचा निकाल विक्रमी ८१.१५ टक्के लागला आहे. परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा मुलीनीच बाजी मारली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागाचा निकाल वाढला आहे. निकालात दक्षिण कन्नड राज्यात प्रथम स्थानावर असून गदग सर्वात कमी निकालासह अंतिम स्थानावर आहे. दरम्यान, बेळगाव जिल्हा ७७.२० टक्के निकालासह राज्यात २७ व्या, तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा ८४.१० टक्के निकाल लागून राज्यात १५ व्या स्थानार आहे.
२०२३ मध्ये राज्याचा निकाल ७४.६७ टक्के लागला होता. यावेळी ६.४ टक्क्यांनी वाढ झाली असून विक्रमी ८१.१५ टक्के निकालाची नोंद झाली आहे, जी एक सकारात्मक बाब आहे. कारण दरवर्षी निकालात वाढ होत आहे. एकूण सहा लाख ८१ हजार ०७९ विद्यार्थी बारावी – १ परीक्षेला बसले होते. १ ते २७ मार्च या कालावधीत राज्यातील १,१२४ केंद्रात परीक्षा झाली. यामध्ये पाच लाख २२ हजार ६९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे अध्यक्ष एन. मंजुश्री यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. कला शाखेत ६८.३६ टक्के, वाणिज्य ८०.९४ टक्के आणि विज्ञान शोखेत ८९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्हानिहाय निकालात नेहमीप्रमाणे यंदाही दक्षिण कन्नड, उडुपी, विजयपूर अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत, तर गदग शेवटच्या क्रमांकावर आहे.
हुबळीची विद्यालक्ष्मी राज्यात प्रथम
विज्ञान शाखेत हुबळीच्या विद्यालक्ष्मीने ५९८ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. आदी चंचनगिरी महाविद्यालयाचा के. एच. उर्विश, आचार्य विद्यायोदयची वैभवी, तुमकूरच्या गुरूराज कॉलेजची जान्हवी, उत्कृष्ट पीयु कॉलेजचा गुणसागर यांना प्रत्येकी ५९७ गुण मिळाले.
कला विभागात बंगळुरच्या एनकेआरव्ही पीयू कॉलेजच्या मेधा डी., एसएसपी कॉलेजच्या वेदांत जयनुबा नवी (विजयपुर), इंदू पीयू कॉलेज, कुडलगी, कोट्टूर तालुका, बळ्ळारी जिल्ह्यातील कविता बी.व्ही. यांना प्रत्येकी ५९६ गुण मिळाले.
वाणिज्य विभागात विद्यानी पीयू कॉलेज, तुमकूरच्या ज्ञानवी एम. ५९७, कुमदवती महाविद्यालय, शिकारीपुर, शिमोगा जिल्ह्यातील पवन एम. एस. ५९६, पूर्णा प्रज्ञा पीयू कॉलेज, उडुपी, हर्षिता एस. एच. ५९६ गुण मिळाले.
यावेळी परीक्षेला बसलेल्या ६,२२,८१९ नवीन विद्यार्थ्यांपैकी ५,२६,५५८ 558 (८४.५९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३६,००७ पुनरावृत्ती (रिपीटर्स) झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १५,११६ विद्यार्थी (४१.९८ टक्के) उत्तीर्ण झाले, २२,२५३ खासगी विद्यार्थ्यांपैकी १०,७१६ (४८.१६ टक्के) उत्तीर्ण झाले.
कला विभागात १,८७,८९१ पैकी १,२८,४४८ (६८.३६ ट्के), वाणिज्य शाखेत २,१५,३५७ पैकी १,७४,३१५ (८०.९४ टक्के), विज्ञान शाखेत २,७७,८३१ पैकी २,४९,९२७ (८९.९६ टक्के ) विद्यार्थी उत्तिर्ण झाले. ३,२१,४६७ मुले परीक्षेला बसली होती त्यापैकी २,४७,४७८ (७६.९८ टक्के) मुले उत्तीर्ण झाली. त्याचप्रमाणे ३,५९,६१२ मुली परीक्षेला बसल्या होत्या, त्यापैकी ३,०५,२१२ (८४.८७ टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या
ग्रामीण विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण शहरी विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे.
यावेळी १,५३,३७० विद्यार्थ्यांना ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आणि २,८९,७३३ विद्यार्थ्यांनी ६० टक्के किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळवले आहेत.
३५ महाविद्यालयांचा शून्य टक्के निकाल
२६ अनुदानित पदवीपूर्व कॉलेजचा १०० टक्के निकाल, सहा कॉलेजचा शून्य टक्के निकाल लागला, ३४५ विनाअनुदानित पदवीपूर्व कॉलेजचा १०० टक्के आणि २६ कॉलेजचा निकाल शून्य टक्के, तसेच आणि एका संयुक्त पदवीपूर्व कॉलेजचा १०० टक्के व एका कॉलेजचा निकाल शून्य टक्के निकाल लागला आहे. एकूण ४६३ कॉलेजांचा १०० टक्के निकाल तर ३५ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
जिल्हावार निकाल (टक्केवारी)
दक्षिण कन्नड – ९७.३७
उडुपी – ९६.८०
विजयपूर – ९४.८९
उत्तर कन्नड – ९२.५१
कोडगु – ९२१३
बंगळूर दक्षिण – ८९.५७
बंगळूर उत्तर – ८८.६७
शिमोगा – ८८.५८
चिक्कमंगळूर – ८८.२०
बंगळूर ग्रामीण – ८७.५५
बागलकोट – ८७.५४
कोलार – ८६.१२
हसन – ८५.८३
चामराजनगर – ८४.९९
चिक्कोडी – ८४.१०
रामनगर – ८३.१०
म्हैसूर – ८३.१३
चिक्कबळ्ळापूर – ८२.८४
बिदर – ८१.६९
तुमकूर – ८१.०३
दावणगेरे – ८०.९६
कोप्पळ – ८०.८३
धारवाड – ८०.७०
मंड्या – ८०.५०
हावेरी – ७८.३६
यादगिरी – ७७.२९
बेळगाव – ७७.२०
गुलबर्गा – ७५.४८
बळ्ळारी – ७४.७०
रायचूर – ७३.११
चित्रदुर्ग – ७२.९२
गदग – ७२.८६