Tuesday , September 17 2024
Breaking News

विधान परिषद सदस्यांचा शपथविधी; चन्नराज हट्टीहोळी यांनी घेतली शपथ

Spread the love

बेळगाव (वार्ता) : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा शपथविधी सोहळा आज बेंगळुरात पार पडला. यावेळी बेळगावचे एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
नव्याने निवडून आलेल्या विधान परिषद सदस्यांचा शपथविधी गुरुवारी बेंगळुरातील विधानसौधमधील बँक्वेट हॉलमध्ये पार पडला. यावेळी सभापती बसवराज होरट्टी यांनी नव्या सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी बेळगाव स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी यांनी आपले कुलदैवत वीरभद्रेश्वर आणि बसवेश्वर यांच्या नावे सदस्यत्वाची शपथ घेतली. आधी आपल्या मातोश्री गिरीजा आणि बेळगाव जिल्ह्याचा उल्लेख करून नंतर कुलदैवत वीरभद्रेश्वर आणि बसवेश्वर यांचा उल्लेख त्यांनी केला. शपथविधीला जाण्यापूर्वी त्यांनी विधानसौधच्या उंबरठ्याला नमस्कार केला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आ. महांतेश कौजलगी, श्रीनिवास माने, लक्ष्मी हेब्बाळकर, काँग्रेस नेते माजी मंत्री ए. बी. पाटील, शाम घाटगे, राजू कागे, धुळगौडा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 घरगुती मखर सजावट स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न

Spread the love  खानापूर : खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *