बबेळगाव : बेळगावातील सर्वसामान्य महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या तारांगण परिवार व हॅपी टू हेल्प या सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेमार्फत वटपौर्णिमा या सणानिमित्त एक सामाजिक प्रबोधनात्मक ‘ऑनलाइन सेल्फी स्पर्धे’ चे आयोजन केले आहे. वटपौर्णिमा पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी व्रत करते. वडाच्या झाडाची पूजा करते. ही वर्षानुवर्षे परंपरा चालत आली आहे. या पारंपरिक सणाचे औचित्य साधून महिलांच्या छायाचित्र कलेला वाव मिळावा तसेच त्यांच्या हातून वृक्षारोपण व्हावे हा प्रबोधनात्मक उद्देश ठेवून स्पर्धा आयोजित केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाप्रलय माजून त्यावेळी प्राणवायू अभावी अनेकांना जीव गमवावा लागला. हा प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची रोपण व संवर्धनाची आजकाल गरज आहे. हे कार्य महिलांच्या हातून घडण्यास उद्याच्या सणानिमित्य प्रारंभ व्हावा हा उदात्त हेतू ठेवून स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेचे नियम
१) बेळगाव जिल्ह्यातील कोणतीही महिला या स्पर्धेमध्ये सहभागी होवू शकते.
२) स्पर्धकाने आपल्या अंगणात किंवा कुंडीत रोप लावायचे आहे व रोपासोबतचा सेल्फी फोटो पाठवणे अनिवार्य आहे.
३) स्पर्धकाने आपले नाव, पत्ता व फोन नंबर फोटॊ सोबत पाठवणे आवश्यक आहे. सेल्फी फोटो मध्ये पारंपरिक वेशभूषेसह रोपटे व स्पर्धक दिसणे आवश्यक आहे.
४) या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु २५.
५) ही ऑनलाईन स्पर्धा असून स्पर्धकाने फोटो काढून
दिनांक २४ जून २०२१ ते २७ जून २०२१ पर्यंत या कालावधीमध्ये ९३४१४१११८६ किंवा ९८४५८८३८५३ या नंबर गुगल पे किंवा फोन पे वर प्रवेश शुल्कासह पाठवण्याचे आहेत.
६) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.