बेंगळुरू : कर्नाटक सरकारने एसएसएलसी परीक्षेसंदर्भात नुकताच एक मार्गदर्शक सूचना जरी केली आहे त्यानुसार दहावीच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. परीक्षा काळात कोविड संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. परीक्षा काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 28 जुने रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीएओ, डीएचओ, एसपी तसेच ट्रेझरी अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिक्षक, कर्मचारी आणि परीक्षा कामात सहभागी अधिकाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने कोरोना लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. जिल्हा निरीक्षकांनी तपासणी व अमलबजावणीपूर्वी प्रत्येक परीक्षा केंद्रावर एसओपी अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येणार आहे. जर परीक्षार्थींना आरोग्य विषयक समस्या असल्यास त्या परीक्षार्थींना स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली पाहिजे. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश द्यावा परीक्षा केंद्राचे नियमित निर्जंतुकीकरण करणे. तसेच आरोग्य तपासणी काउंटर सकाळी 8.30 वाजता सुरू होतील. परीक्षा केंद्राबाहेर ऑक्सिमिटर, थर्मल स्कॅनिंग तसेच प्रथमोपचार बॉक्स ठेवण्याची शिफारस करण्यात आले आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे
