बेंगळुरू : राज्यात लस, ब्लॅक फंगसच्या औषधांचा तुटवडा आहे हे सत्य आहे. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्रीयमंत्री सदानंदगौडा यांच्या संपर्कात आहोत. केंद्राकडे २० हजार व्हायल्स इंजेक्शन्सची मागणी केली असून केंद्राने ११५० व्हायल्सचा पुरवठा केला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
बंगळुरात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, प्राथमिक अहवालानुसार, राज्यात ३०० हुन अधिक ब्लॅक फंगसचे रुग्ण आहेत. या रोगांवर उपचारांची सोय संबंधित तज्ज्ञ सर्व जिल्हा इस्पितळात आहेत. याशिवाय १७ सरकारी मेडिकल कॉलेज आहेत. देशात ब्लॅक फंगसने सुमारे ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या प्रमाणात व्हायल्सचा पुरवठा निश्चित केला जातो. स्टेरॉईड्सचा अधिक वापर आणि नाल्यातील पाण्याचा वापर केल्याने या रोगाचा संसर्ग होतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयसीयूत एका रुग्णाला वापरलेली उपकरणे दुसऱ्याला वापरण्यापूर्वी सॅनिटाईझ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकच मास्क बरेच दिवस वापरल्यामुळेही ब्लॅक फंगस होण्याची शक्यता आहे असे डॉ. सुधाकर म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta