Tuesday , May 28 2024
Breaking News

Spread the love

‘सायलंट’ मतदारांच्या हाती कुडतरीचे भवितव्य!

रेजिनाल्डवर नाराजी : पण आव्हान कायम

 

मडगावअवघ्या 27 दिवसात दोन पक्ष बदलणारे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यावर कुडतरीत लोक प्रचंड नाराज आहेत. मात्र, असे असले तरी अपक्ष म्हणून यावेळी निवडणूक लढवित असूनही ते अजून मुख्य शर्यतीतून मात्र बाहेर पडलेले नाहीत.पण निर्णय सायलंट वाटणाऱ्या मतदारांच्या हातीच आहे.

फक्त दोनवेळचा अपवाद वगळता कुडतरी हा मतदारसंघ परंपरेने काँग्रेस बरोबरच राहिलेला आहे. अशा या मतदारसंघात यावेळी काँग्रेसने आपली उमेदवारी 20 दिवसांसाठी भाजपवासी होऊन पुन्हा काँग्रेस (Congress) पक्षात आलेले माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो यांना दिली आहे. आपने यावेळी रायचे जिल्हा पंचायत सदस्य डॉमनिक गावकर याना उमेदवारी दिली असून भाजपने आपला एसटी नेता अँथनी बार्बोजा याना रिंगणात उतरविले आहे. त्याशिवाय तृणमूलने (TMC) अँथनी पिशॉट याना उमेदवारी दिली आहे.

वास्तविक आपल्या कामांमुळे मतदारसंघात लोकप्रिय असलेल्या रेजिनाल्ड (Aleixo Reginaldo) यांनी निवडणुकीच्या तोंडावर ज्या बेडूकउड्या मारल्या, त्यामुळे मतदारांमध्ये ते चेष्टेचा विषय बनले आहेत. असे असले तरी अडचणीत लोकांना तारणारे आमदार ही त्यांची ओळख कायम आहे. तीच त्यांच्यासाठी आशेचा किरण बनली आहे.

‘काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये गेल्याने लोक त्यांच्यावर नाराज झाले आहेत, हे खरे.पण त्यांनी लोकांची कामे केली आहेत. त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो’, असे मत आर्नाल्ड कॉस्ता यांनी व्यक्त केले.

कुडतरीत जिंकणार कोण, हा प्रश्न विचारला असता, ‘जो उमेदवार चांगला आहे तो जिंकणार’, असे मत सांतान रॉड्रिग्स यांनी व्यक्त केले. कुडतरीत बरेच ‘सायलंट’मतदार सक्रिय झाले असून तेच कुडतरीचे भवितव्य ठरवतील, असे चित्र आहे,असेही ते म्हणाले.

मोरेनची भिस्त पारंपरिक मतांवर !

काँग्रेसचे मोरेन रिबेलो (Moreno Rebelo) हे पारंपरिक काँग्रेस मतांच्या भरवशावर आपल्या विजयाची गणिते मांडत आहेत. शिवाय रेजिनाल्ड यांच्या विरोधात असलेली मते त्यांना पडू शकतील. या निवडणुकीत (Goa Elections) तृणमुलने आपला उमेदवार उभा केलेला असला तरी चर्चिल आलेमाव यांचे समर्थक यावेळी मोरेन सोबत वावरताना दिसतात. आपने एसटी नेते डॉमनिक गावकर यांना उमेदवारी दिली आहे. पण भाजपनेही एसटी उमेदवार उभा केल्याने ते काही प्रमाणात अडचणीत आले आहेत.

 

About Belgaum Varta

Check Also

ट्रॅक्टर खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  खानापूर तालुक्यातील तोलगी येथील घटना खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी येथे ट्रॅक्टर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *