Sunday , July 26 2026
Breaking News

अंकलेची पाणी समस्या सुटली : रमेश कत्ती

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले ग्रामपंचायतची पाणी समस्या सोडविण्यासाठी आपण केलेले प्रयत्न फलदायी ठरल्याचे माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सांगितले. ते अंकले गाडगी गल्लीतील श्री गणेश जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन, दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करुन बोलत होते. ते पुढे म्हणाले, अंकलेकरांचा पाणी प्रश्न सुटला आहे. दररोज हिडकल डॅम येथून थेट अंकलेला पाच लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आता नो पाणी टंचाई म्हणावी लागेल. अंकले ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकले ग्रामपंचायत अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी भूषविले होते. यावेळी अंकले ग्रामपंचायत उपाध्यक्षा श्रीमती अनिता आजरेकर, सदस्य भरत पुंडे, ईश्वर कोणकेरी, ईश्वर बाडकर, विश्वनाथ पाटील, गंगव्वा खातेदार, सुजाता गस्ती, ॲड. जी. आर. पाटील, कुमार किंवडा, आंगद जरळी, शशीकांत सुर्यवंशी, मंजू कोनेरी ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *