बेंगळुरू : मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी राज्यातील लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालावर अवलंबून असेल, असे म्हंटले आहे. दरम्यान राज्यातील कोविड प्रकरणांची संख्या कमी झाल्याने ७ जून रोजी लॉकडाऊन अनलॉक करताना कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान बृह बेंगळूर महानगर पालिका (बीबीएमपी) टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उघडण्याच्या बाजूने आहे. दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठविणे आणि निर्बंध शिथिल करणे आवश्यक आहे. करण एकदमच लॉकडाऊन उठविला तर पुन्हा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी सोमवारी सांगितले की कोविड प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवावा आणि यासंदर्भात सरकारशी चर्चा केली जाईल. दरम्यान, लॉकडाऊनपूर्वी लोकांना सामान्य जीवनशैलीकडे जाण्याची गरज आहे, परंतु ते टप्प्याटप्प्याने केले जाणे आवश्यक आहे. यासाठी काही बंधने कशी शिथिल करावीत यावर सरकार विचार करत आहे, असेही ते म्हणाले.
तथापि, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, “वैज्ञानिक सल्ल्यानुसार निर्बंध कमी करण्याचा निर्णय सरकार घेईल. तांत्रिक सल्लागार समितीने आपला अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मंत्रिमंडळात या विषयावर चर्चा होईल. चर्चेनंतरच राज्यातील लॉकडाऊन उठवायचा की वाढवायचा हे निश्चित होईल.