खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या रोहयो योजनेअंतर्गत भुरूनकी (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीत हजारो रोपाची लागवड करण्यासाठी खड्डे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र कामे बंद आहेत. नागररिकांना कामे मिळणे कठीण आहे. तेव्हा भुरूनकी गावाच्या नागरिकांना उद्योग खात्री योजनेअंतर्गत कामे मिळावी यासाठी रोप लागवड योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे.
यासाठी प्रत्येक मजुराला २९९ रूपये प्रत्येक दिवसाला मजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती खानापूर तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रकाश हलण्णावर यांनी बोलताना सांगितले.
यावेळी भुरूनकी ग्राम पंचायत हद्दीतील २०० मजुराना या कामाचा लाभ मिळाला.
झाडे लावा झाडे जगवा या सरकारच्या आदेशानुसार भुरूनकी ग्राम पंचायतीच्या कार्याचे तालुक्यातून कौतुक होत आहे. ही योजना खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून राबविण्यात येणार आहे.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …