निपाणी : देश कोरोनाच्या महामारीशी लढत आहे. यामध्ये अग्निशामक दलही जिवाचे रान करून जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात प्रथमदर्शी कोरोना योद्धे म्हणून अग्निशामक दल काम करत आहेत. त्याची दखल घेऊन कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने ‘आपले अग्निशामक दल, आपला अभिमान’ अंतर्गत चिकोडी जिल्हा काँग्रेस व निपाणी विधानसभा काँग्रेस यांच्याकडून निपाणी अग्निशामक दल प्रशासनाला सॅनिटायझर व मास्क वितरण करण्यात आले. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, निकू पाटील, श्रीनिवास संकपाळ, संदीप चावरेकर, बाळू कमते, आकाश खवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत शेंडूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : सरकारने शेतकऱ्यांच्या …