Sunday , July 26 2026
Breaking News

अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण

Spread the love

निपाणी : देश कोरोनाच्या महामारीशी लढत आहे. यामध्ये अग्निशामक दलही जिवाचे रान करून  जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात प्रथमदर्शी कोरोना योद्धे म्हणून अग्निशामक दल काम करत आहेत. त्याची दखल घेऊन कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने ‘आपले अग्निशामक दल, आपला अभिमान’ अंतर्गत चिकोडी जिल्हा काँग्रेस व निपाणी  विधानसभा काँग्रेस यांच्याकडून निपाणी अग्निशामक दल प्रशासनाला सॅनिटायझर व मास्क वितरण करण्यात आले. यावेळी  चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, निकू पाटील, श्रीनिवास संकपाळ, संदीप चावरेकर, बाळू कमते, आकाश खवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला करणाऱ्यावर कारवाई करा : बोरगाव येथे निषेध मोर्चा काढून निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *