बेळगाव : पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार अनिल बेनके, कृषिप्रधान आर. बी. नाईकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि डी. बी. पाटील यांच्या द्रोण कॅमेऱ्याच्या सहाय्याने बुधवारी सकाळी पाहणी करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भातशेतीच्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सुनावणी कृषी अधिकाऱ्यांना आमदार अनिल बेनके यांनी दिली
यावेळी अनिल बेनके यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आपले आधार कार्ड, बँक पास बुक, सात बारा उतारा शेतकरी संघटनेच्या नारायण सावंत किंवा सुनील जाधव यांना संपर्क साधावा, जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय सुविधा मिळविण्यास मदत होईल, मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे पैसे सरकारी बॅंक खात्यात पडून आहेत पण शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाठपुरावा न केल्यामुळे त्यांची नुकसानभरपाई रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यास अधिकाऱ्यांना अडचण येत आहे. याकरिता यावर्षी आम्ही द्रोण कॅमेऱ्यामार्फत नवीन नाल्याच्या बाजूंनी सर्व्हेक्षण आज रोजी केले आहे तरी शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे बेळगाव शेतकरी संघटनाकडे 31 जूनपर्यंत जमा करावी.