Monday , September 21 2026
Breaking News

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बेळगाव दौर्‍यावर

Spread the love

 

बेळगाव : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी (दि. 3) बेळगाव दौर्‍यावर येणार आहेत. दुपारी चार वाजता त्यांच्या हस्ते केएलईच्या डॉ. संपतकुमार एस. शिवनगी कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, आमदार राजू सेट, आमदार अभय पाटील, केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, काहेरचे कुलगुरु डॉ. नितीन गंगणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपती मुर्मू पहिल्यांदाच बेळगावला येत असून त्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. हा सोहळा 30 डिसेंबर रोजी होणार होता. मात्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्यामुळे शुक्रवारी उद्घाटन होणार आहे.

कॅन्सर हॉस्पिटल सुमारे 1 लाख 75 हजार चौरस फुटांत असून 300 खाटांची व्यवस्था आहे. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी पुणे, बंगळूर, मुंबईसह इतर ठिकाणी जावे लागत होते. मात्र आता बेळगावात रेडिओथेरेपी, किमोथेरेपीसह कॅन्सरसंबंधीचे सर्व उपचार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष डॉ. कोरे यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *