खानापूर (प्रतिनिधी) : आज चौथ्या दिवशीही खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या, नाल्याच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे.
तालुक्यातील खेडेगावात भात रोप लागवडीचे काम अजुन बऱ्याच ठिकाणी व्हायचे आहे. त्यामुळे भात रोप लागवडीला जोर आला आहे. यंदा पावसाने योग्य साथ दिली नाही. त्यामुळे रोप लागवडीचे काम रेंगाळले आहे. नुकताच सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व भात लागवडीला पुन्हा जोरात सुरूवात झाली.
खानापूरच्या मलप्रभा नदीच्या पातळीत गेल्या दोन दिवसापासुन पावसाचा जोर वाढल्याने बरीच वाढ झाली आहे. तालुक्यातील नाले, तलावात पाण्याची पातळी वाढली आहे.
सततच्या पावसाने तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीस अडचणीचा झाला आहे.
खानापूर-रामनगर रस्ता सतत पडणाऱ्या पावसाने जागोजागी पाणी साचुन तळ्याचे स्वरूप आले. नुकताच सुरू झालेल्या खानापूर-रामनगर रस्त्याचे पॅचवर्क तुर्तास थांबले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे आहे.
खानापूर :४५.७मि.मी,. नागरगाळी:३८.४ मि. मी., बिडी:२२.४मि.मी., कक्केरी:२८.४ मि. मी., असोगा :५६.६ मि. मी., गुंजी:४३.६मि.मी., लोंढा रेल्वे: ७१ मि मी., लोंढा पिडब्लूडी ६४.४ मि. मी., जांबोटी:५२ मि. मी., कणकुंबी:१७०.६ मि. मी.,
अशी नोंद आहे.
Check Also
मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे
Spread the love खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच …