Sunday , October 13 2024
Breaking News

आरोग्य अधिकारी डॉ. नांद्रेचा नगरपंचायतीच्यावतीने सत्कार

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात नगरपंचायतीच्यावतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
गेल्या दोन वर्षापासुन देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला. अनेकाचे संसार उघड्यावर पडले, कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. त्याच बरोबर अनेकांना नोकरी गमवावी लागली. कित्येकाचे रोजगार गेले. अशावेळी कोरोनाच्या विरूद्ध लढण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण सुरू झाले. देशातील शहरापासून खेड्यापर्यंत सर्वानाच कोरोनाची लस देणे गरजेची होती.
यासाठी खानापूर शहरातील २१ वार्डातून काटेकोरपणे कोरोना लसीकरणाचे काम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल खानापूर नगरपंचायतीच्यावतीने खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांचा सत्कार सोहळा नगरपंचायतीच्या सभागृहात नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते.
यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण मादार, नगरसेवक आप्पाया कोडोळी, रफिक वारेमनी, विनायक कलाल, नगरसेविका राजश्री तोपिनकट्टी, शोभा गावडे, लता पाटील व इतर नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार केला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. संजय नांद्रे म्हणाले की, कोरोना काळात नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवक, नगरसेविकांनी लसीकरणाच्या काळात मोठी जबाबदारी स्विकारून जी मदत केली. त्यामुळे खानापूर शहरात २० हजारहुन अधिक जणाना लसीकरण करण्यात यश आले. केवळ हा माझा सत्कार नसुन संपूर्ण खानापूर शहरवासीयाचा सत्कार आहे.
यावेळी नगरपंचायतीचे अभियंते सुहास गुरव, प्रेमानंद नाईक, एस. आर. पाटील, व इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रेमानंद नाईक यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी

Spread the love  खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *