Tuesday , March 18 2025
Breaking News

खानापूर तालुक्यातून दहावी परीक्षेला २३ केंद्रात ४२१४ विद्यार्थी बसणार

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : सन २०२१-२२मधील दहावीची परीक्षा जुलैच्या १९ व २२ रोजी होणार आहे.
सदर दहावी परीक्षेला तालुक्यातून जवळपास ४२१४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी तालुक्यात दहावी परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तर ३७१ परीक्षा खोल्यांचे आयोजन करण्यात आले.
या दहावीच्या परीक्षेत १९०० मुले, १७८५ मुली, असुन बहिस्थ विद्यार्थ्यामधून ३६५ मुले व ७४ मुली अशी एकूण ४२१४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

तालुक्यातील दहावी परीक्षा केंद्रे व केंद्रातील विद्यार्थी
मराठा मंडळ हायस्कूल खानापूर २५४ विद्यार्थी, ताराराणी हायस्कूल खानापूर १७३ विद्यार्थी, सर्वोदय विद्यालय खानापूर १६८ विद्यार्थी, स्वामी विवेकानंद इंग्रजी स्कूल खानापूर १९३ विद्यार्थी, मराठा मंडळ पीयू काॅलेज खानापूर १७० विद्यार्थी, माध्यमिक विद्यालय जांबोटी १०२ विद्यार्थी, बाबूराव ठाकूर पीयू काॅलेज जांबोटी २०९ विद्यार्थी, एम जी एच एस हायस्कूल नंदगड १८६ विद्यार्थी, एमजीएचएस पीयू काॅलेज नंदगड २८५ विद्यार्थी, हलशी हायस्कूल हलशी ८७ विद्यार्थी, सरकारी मराठी शाळा हलशी १५४ विद्यार्थी, बी व्ही एच एस पारिश्वाड १०८ विद्यार्थी, हनीवेल इंटरनॅशनल स्कूल पारिश्वाड ९९ विद्यार्थी, एनएएचएस बिडी १७५ विद्यार्थी, होलीक्राॅस कॉन्व्हेंट बिडी २५० विद्यार्थी, जेएचएस लिंगनमठ १४१ विद्यार्थी, सीआरएस प्रौढशाळा इटगी ३३४ विद्यार्थी, जेएचएस चिकदिकोप १४७ विद्यार्थी, जेएचएस हिरेमन्नोळी १८५ विद्यार्थी, जेपीव्ही गर्लगुंजी १७३ विद्यार्थी, जेएसडी इदलहोंड १३० विद्यार्थी, लोंढा हायस्कूल २०५ विद्यार्थी, सरकारी प्रौढ शाळा गुंजी १९६ विद्यार्थी आहेत.
दि. १९ रोजी गणित, विज्ञान, समाज विज्ञान पेपर सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यत होणार आहे.
दि. २२ रोजी प्रथम भाषा, व्दितीय भाषा, तृतीय भाषा सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन सक्तीचे आहे. यावेळी तहसीलदार, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी, बीईओ असे तीन फरारी पथके असुन पोलीस, आरोग्य खात्याचे कर्मचारी वर्गाची नेमणुक करण्यात आली आहे. परिक्षेच्या आवारात विद्यार्थी, परिक्षक व्यतिरीक्त कुणालाही परवानगी देण्यात येणार नाही.

About Belgaum Varta

Check Also

नंदगड जेसीएस मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

Spread the love  नंदगड : नंदगड येथील मराठी मुला-मुलींच्या शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *