बेळगाव : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी संकेश्वर मधील पूर परिस्थितीची पाहणी केली. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. नदी व नाले ओसंडून वाहत असून अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. त्याकरिता शनिवारी केपीसीसी कार्याध्यक्ष व आमदार सतीश जारकीहोळी तसेच बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संकेश्वर येथे भेट देऊन तेथील पूर परिस्थितीची पाहणी केली. ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी सरकारने निधी मंजूर करावा असे यावेळी सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी संकेश्वरमधील पूर
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …