खानापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या प्रत्येक सवलतीचा लाभ वेळेत घेऊन प्रगती साधली पाहिजे. बी बियाणे, खते, आवजारे आदींचा वेळेत उपयोग झाला तर शेतकरीवर्गाची प्रगती नक्कीच होईल, असे मत आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सोमवारी कृषी खात्याच्या अभियान प्रारंभी वेळी व्यक्त केले.
खानापूरात सालाबादप्रमाणे यंदाही कृषी खात्याच्यावतीने कृषी खाते शेतकऱ्याच्या दारी अभियानाचा शुभारंभ सोमवारी दि. २६ रोजी कृषी खात्याच्या कार्यालयात पार पडले
यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर तहसीलदार रेश्मा तालिकोटी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. कोडगी, एस. एस. पोवाडे, इतर तालुका अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कृषी सहाय्यक निर्वाहक अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी हिरवा झेंडा दाखवुन अभियानाला चालना दिली.
यावेळी बोलताना कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण म्हणाले की, तालुक्यातील जांबोटी, खानापूर, बीडी, गुंजी संपर्क केंद्राच्यातून प्रत्येक ग्राम पंचायतीच्यावतीने कृषी अभियानाव्दारे कृषी तज्ञ डॉ. पी. एस. मत्तीवडे याचे शेतकर्यांना मार्गदर्शन होणार आहे.
प्रारंभी कृषी अभियान वाहनाचे पुजन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी केले.
यावेळी तालुक्यातील शेतकरी वर्ग, तालुका अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार एस. एस. पोवाडे यांनी मानले.