खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणाऱ्या खानापूर तालुक्याला नुकताच झालेल्या महाभयंकार अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यातील बिजगर्णि ग्राम पंचायत हद्दीतील करंजाळ गावच्या सुब्राव मऱ्याप्पा पाटील यांच्या सर्वे नंबर ९ मधील तीन एकर भात जमिनीचे तसेच दोन एकर माळ जमिनीचे मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.
या शिवारात बांधाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत येते. त्यामुळे माळ जमिनीसह भाताची रागं जमिन पाण्याच्या प्रवाहाने तुटून गेली आहे.
नुकताच तीन एकर जमिनीत भाताची लागवड करण्यात आली होती. परंतु मुसळधार पावसाने संपूर्ण नटीच वाहुन गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.
नुकसानीची पाहणी संबंधित अधिकारी वर्गाने करून त्वरीत नुकसान भरपाई मंजुर करून द्यावी. यासाठी संबंधित दंडाधिकारी वर्गाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी कंरजाळ भागातील शेतकरी वर्गातुन होत आहे.
- प्रतिक्रिया
नुकताच संपूर्ण शेतात भात लागवड करून पूर्ण केले होते. परंतू नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने लागवड केलेल्या भाताचे प्रचंड नुकसान झाले आहे.
तेव्हा शेतकऱ्याच्या भात शेतीचा सर्वे करून शेतकऱ्यांनी योग्य ती नुकसान भरपाई तालुका अधिकाऱ्यांनी द्यावी.
-शेतकरी सुब्राव पाटील करंजाळ