खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात जाणाऱ्या तालुका मलप्रभा क्रिडांगणाजवळील रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यानगर मयेकर नगरात जाणाऱ्या रस्त्याचे दुरूस्तीचे काम झालेच नाही. त्यामुळे याभागात गुडघाभर चिखल पावसाळ्यात होतो. त्यामुळे वाहने अडकण्याच्या घडना घडतात. नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी विद्यानगर, मयेकर नगरातील नागरिकांतून होत आहे.
*प्रतिक्रिया
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगर, मयेकर नगराला जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रात्री अपरात्री येथून ये-जा करताना नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या संकटाशी सामना करावा लागतो. तेव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडूजी करावी.
– विनायक मुतगेकर, रहिवासी, विद्यानगर-खानापूर.
Check Also
काळ्या दिनासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जांबोटी विभागात जनजागृती
Spread the love खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने …