खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यासाठी राज्य वननिगमच्या संचालकांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.
राज्यातून वननिगमच्या संचालकांचा अभ्यास दौरा सुरू आहे. नुकताच खानापूर तालुक्यातील वनसंपदेची पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात वन निगमाचे संचालक सुरेश देसाई, त्यांच्यासोबत राज्य गोपाल, भागा आरेश, प्रदिप कुमार, वनाधिकारी हनमंत राजू, गिरीश इटगी आदीचा समावेश होता.
यावेळी राज्यातील वनसंपदेची माहिती व्हावी. वृक्ष लागवडीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात यावा. हा या दौऱ्यामागचा उद्देश आहे.
या दौऱ्यात खानापूरसह यल्लापूर, शिरसी, दांडेली, जोग, सागर, शिमोगा, चिकमंगळूर, मुडकेरी, बेंगळुर आदी भागातील रोप वाटीका, वृक्षवाटीकांना भेटी देण्यात आल्या.
तसेच चंदन, सागवान, बाबू लागवडीच्या क्षेत्राची पाहणी करण्यात येत आहे
याशिवाय जंगल क्षेत्राचा विकास व विस्तार याबद्दल संचालकांना माहिती देण्यात येणार आहे.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …