बेळगाव : वार्ड क्र. 50 मधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांच्या प्रचारासाठी कारभार गल्ली पिंपळकट्टा गणपती-हनुमान मंदिरात ज्येष्ठ पंच यल्लाप्पा केदारी कणबरकर यांच्या हस्ते पूजा करून प्रचारास सुरुवात केली.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना वाढता पाठींबा मिळत आहे. त्यांनी कारभार गल्लीतील सुरेश जोतिबा रेडेकर, दिलीप यल्लोजीराव नाईक, शशिकांत महादेव धामणेकर, बाजीराव साताप्पा मन्नूरकर, नारायण इराप्पा जुवेकर आदि ज्येष्ठ पंचांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला.
जनतेने समितीच्या अधिकृत उमेदवाराच्या खंबीर उभे राहून निवडून द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.
Check Also
कुस्ती वस्ताद व प्रसिद्ध पैलवान काशिराम पाटील यांचे निधन
Spread the love बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील रहिवासी, प्रसिद्ध पैलवान कुस्ती वस्ताद काशिराम कल्लाप्पा …