निपाणीतील काँग्रेस पदाधिकार्यांनी कागल येथे घेतली भेट
निपाणी : महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विकासकामांची चर्चा महाराष्ट्राबरोबर सीमाभागातही आहे.
सीमाभागातील शेकडो नागरिकांना त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. असे असताना त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून सीमावासीय म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी ठाम असल्याचे निपाणीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले. रविवारी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे व काँग्रेस कार्यकर्त्यांनी कागल येथे मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली.
यावेळी तवंदी येथील ज्ञानेश्वर पाटील हे मुंबई परिवहन विभागात कार्यरत असताना आरोग्याचे कारण सांगत. त्यांना कामावरून ब्रेक घेण्यात आला. तीन वर्षानंतरही रुजू करून न घेतल्याने पाटील यांनी कामगार न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यांना कामावर रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले. तरीदेखील अद्याप परिवहन विभागाने कामावर न घेतल्याने याप्रश्नी लक्ष घालून पाटील यांना कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी यावेळी मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली. त्यानुसार तातडीने लक्ष घालून याप्रश्नी पाटील यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली. लवकरच निपाणीस भेट देणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक संदीप चावरेकर, बाळू कमते, संदीप घोरपडे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …