हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हुक्केरी तालुक्याच्या बेनकनहोळी गावानजीक घटप्रभा नदीत रविवारी सायंकाळी घडली आहे. लक्ष्मण राम अंबली (वय 49), रमेश लक्ष्मण अंबली (वय 14) आणि यल्लाप्पा लक्ष्मण अंबली (वय 12) अशी मृतांची नावे आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सोमवारी सकाळपासून एनडीआरएफच्या पथकाकडून या तिघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सदर माहिती दिली आहे.
या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.