कोल्हापूर : गेल्या 19 दिवसांपासून एसटी कर्मचार्यांनी विलगीकरणासाठी एल्गार पुकारला आहे. मात्र, राज्य सरकारने तो मुद्दा बाजूला ठेवत 41 टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर विलीनीकरणाचा निर्णय समितीचा अहवालानंतर घेतला जाईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वेतनवाढ झाल्यानंतर विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचारी आग्रही आहेत. त्यामुळे आझाद मैदानात अजूनही आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे काही कर्मचार्यांनी वेतनवाढीच्या घोषणेनंतर कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर विभागातूनही आज मोठी घोषणा करण्यात आली आहे.
एसटी कर्मचारी आंदोलन शुक्रवारी सायंकाळपासून तात्पूरते स्थगित करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी लढा सुरूच राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. याशिवाय आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाया शासनाने मागे घ्याव्यात अशीही मागणी त्यांनी केली.
Check Also
मतदान केंद्र येती घरा….
Spread the love कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला सुरुवात कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र …