खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक को-ऑप. सोसायटीच्या दि. 25 नोव्हेंबरच्या बैठकीमध्ये विद्यमान संचालक व माजी चेअरमन वाय. एम. पाटील यांचे संचालकपद तसेच सभासद एन. डी. कुंभार यांचे सभासद रद्द करण्यात आले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे लोकशाही निर्णयाविरुद्ध आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार, वाय. एम. पाटील यांनी सोसायटीत घडलेली सत्य घटना व्हॉटसअॅपच्या माध्यमातून सर्व सभासदाच्या समोर मांडलेली आहे. सोसायटीचे संचालक या नात्याने सभासदाना घडलेल्या घटना सांगण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. यामध्ये त्यांनी सोसायटीची बदनामी केलेली नाही. यापूर्वी त्यांनी चेअरमन पदावर असताना सोसायटीच्या प्रगतीसाठी अनेक धाडसी निर्णय घेऊन सोसायटीची भरभराटीसाठी, प्रगतीसाठी कार्य केले आहे. अशा जबाबदार संचालकावर केलेली कारवाई चुकीची आहे.
तसेच सोसायटीचे सभासद एन. डी. कुंभार यांना 5 लाख कर्ज देऊन परस्पर त्यांच्या खात्यावरून रक्कम काढून घेऊन जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर झालेला अन्याय त्यांनी सभासदापर्यंत पोहचविल्यामुळे, सोसायटीच्या बदनामीचे कारण दाखवुन त्यांचेही विलंबन केला आहात. हे चुकीचे आहे. तेव्हा वरील दोन्ही सभासदाचे विलंबन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी मागे घ्यावे अन्यथा सोसायटीवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, व डीआरसीएस बेळगाव याच्याकडे न्यायाची मागणी करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन सोसायटीचे चेअरमन गैरजहजर असल्याने सेक्रेटरी निवृत्ती पाटील यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी सेक्रेटरी निवृत्ती पाटील यांनी निवेदनाचा स्विकार करून चेअरमनच्याकडे देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना माजी चेअरमन व विद्यमान संचालक वाय. एम. पाटील, श्री. बेपारी, बी. ए. भोसले, डी. एस. गुरव, एम. एम. सालगुडे, एन. एस. पाटील, एस. डी. पाटील, व्ही. एस. हंचीनमनी, एन. एल. शिवनगेकर, पी. व्ही. पाटील, व्ही. एफ. सावंत, बी. आर. टक्केकर, सौ. अंजना देसाई, सौ. एन. जे. देसाई, आदी शेकडो शिक्षक उपस्थित होते.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …