संकेश्वर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविणेसाठी तो सर्व भाषेत असायला हवे असल्याचे शिवाजी महाराज द.ग्रेटेस्ट पुस्तकाचे लेखक डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी सांगितले. ते संकेश्वर गडहिंग्लज नाका येथील रुक्मिणी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी रुक्मिणी गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील इतर राजेंपेक्षा शिवाजी राजे किती श्रेष्ठ होते हे तुलनात्मकरित्या चित्रफितीसह दाखवून दिले.
प्रारंभी हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले जनरल बिपीन रावत व त्यांच्या 14 सहकारी अधिकार्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण डॉ. स्मृती मंदार हावळ यांनी केले.
डॉ. हेमंतराजे पुढे म्हणाले, संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोचला पाहिजे. त्यासाठी राजेंचा इतिहास सर्व भाषेत असायला हवा आहे. जगात अनेक राजे होऊन गेले. त्यात छत्रपती शिवाजी राजे आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वश्रेष्ठ ठरले आहेत. आमचे राजें कसे श्रेष्ठ होते. हे आपण पुस्तकाच्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. यावेळी डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. सुरेखा एन. हावळ परिवारातर्फे डॉ. हेमंतराजे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. नंदकुमार हावळ परिवार, सुपंथ मंच, दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते.
कार्यक्रमाला एल. पी. शेंडगे, अप्पा मोरे, सुभाष कासारकर, समीर पाटील, शाम यादव, दिपक भिसे, सौ. सविता सावंत, गिरीश कुलकर्णी, अरुणा कुलकर्णी, महेश मिल्के, वैभव शिवणे, मनोज देसाई, मारुती सावंत, राजू इंडी, भरत सुंजे, राजू जाधव, अरुण शेंडे, विकी मोरे, रामा यादव, संतोष डांबरे, आनंद चोरगे, श्रीकांत गायकवाड अनेक मान्यवर शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जयप्रकाश सावंत यांनी मानले.
Check Also
वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप
Spread the love दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …