Saturday , July 27 2024
Breaking News

निपाणीचा रोहित कामत बनला लेफ्टनंट

Spread the love

ओटीए गया येथे घेतली शपथ : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा

निपाणी (विनायक पाटील) : गरिबीची जाण, आई-वडिलांचे कष्ट आणि गुरुवर्यांच्या मागदर्शनानुसार जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात चमकदार कामगिरी करण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या रोहित प्रदीप कामत याची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहित यांच्या या यशामुळे निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बिहारमधील गया येथील ऑफिसर ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी येथे 11 रोजी झालेल्या एका शानदार दीक्षांत समारंभात रोहित यांच्या खांद्यावर वडील प्रदीप कामत व आई शुभांगी कामत यांनी त्यांच्या खांद्यावर अधिकारीपदाचे तारे लावले. या निवडीमुळे निपाणी व परिसरात रोहितचे कौतुक होत आहे.
रोहित कामत याचे प्राथमिक शिक्षण मराठा मंडळ निपाणीत 5 वी ते 10 वी अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालय तर 12 वी पर्यंतचे शिक्षण जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवचंद महाविद्यालयात झाले. 12 मध्ये महाविद्यालयात त्यांने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर भारतीय सैन्याच्या टेक्निकल विभागातील अधिकारीपदासाठी घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर झालेल्या एसएसबी मुलाखतीनंतर त्याची अधिकारी पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यानंतर गया येथे 1 वर्षे, त्यानंतर कॅडेट ट्रेनिंग एमसीईएमई यिंग सिकंदराबाद येथे तीन वर्षे टेक्निकल ट्रेनिंग झाले. गया येथे झालेल्या कार्यक्रमास समिक्षा अधिकारी म्हणून अकॅडमीचे कमाइंट ऑफिसर सेफ्टनंट जनरल जी. व्ही. ए. रेड्डी यांच्यासह काका संदीप कामत, भाऊ सुमित यांनी त्याच्या खांद्यावर अधिकारीपदाचे तारे लावले.
—————-

यशाचे श्रेय कुटुंबियांना निपाणी व कोल्हापूर येथील काही मार्गदर्शकांच्यामुळे आपण या पदापर्यंत पोहचण्यात यशस्वी झालो. वडील, आई , काका व कामत कुटुंबियांने मला प्रोत्साहन दिले. या यशाचे श्रेय त्यांनाच जाते. सीमाभागातून सैन्यात अधिकारी होणार्‍या युवकांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. चिकोडी व निपाणी तालुक्यातून मोठ्या पदांवर काम करणारे अधिकारी आता बनत आहेत. त्याचा अभिमान वाटतो. कमी वयायातही खूप काही करण्यासारखे आहे. पण त्यासाठी योग्य मागदर्शन मिळणे गरजेचे आहे.
– रोहित कामत, लेफ्टनंट
—————-
’शालेय जीवनापासूनच रोहितला सैन्यदलात भरती होण्याची इच्छा होती त्याच्या स्वप्नानुसार आपण त्यांना सहकार्य केले. याशिवाय माझे भाऊ संदीप कामत यांचे हे त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. त्यामुळेच आज तो त्या पदापर्यंत पोहोचू शकला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे.’
-प्रदीप कामत, लेफ्टनंट रोहित कामत यांचे वडील.

About Belgaum Varta

Check Also

व्हटकर कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

Spread the love  निपाण (वार्ता) : येथील जत्राट वेस मधील रहिवासी तिरुपती व्हटकर यांच्या अंगावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *